+918048031926
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
इअरफोनमुळे बहिरेपणा मोबाइल गाणी ऐकता ऐकता फेरफटका मारणे रात्री झोपण्यापूर्वी गाणी ऐकणे, वाहन चालवताना कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे अशा बऱ्याच व्यक्ती आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो. हेडफोनचा अति वापर करणाऱ्या विशेषत: १८ ते २५ वयोगटातील तरुणांमध्ये बहिरेपणाची लक्षणे दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ९० डेसिबलपर्यंतचा आवाज चेतातंतूंना इजा करतात. यामुळे बहिरेपण येते. धक्कादायक म्हणजे, हेडफोनमधून कानावर १०५ डेसिबल आवाज पडत असल्याने अकाली बहिरेपणा येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हा बहिरेपण हे अचानक येत नाही. हेडफोन न वापरताही कानात आवाज ऐकू येणे, कानात रेडिओ किंवा कूकरच्या शिटीसारखा आवाज ऐकू येण, कान बुजल्यासारखा वाटणे अशी काही लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे आढळल्यास तर त्वरित ईएनटी तज्ज्ञांना भेट द्या. हेडफोन्स आणि इअरफोन्समुळे कान सतत मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहतात आणि त्यामुळे कानाच्या नाजूक स्नायूंना इजा होते. हेडफोन आणि इअरफोन 30 ते 50 डेसील्सच्या व्हॉल्यूममध्ये काही काळ वापरले जाऊ शकतात. पण 70 डेसिबल आवाजात दीर्घकाळ वापरल्यास कानाला मोठी हानी होते. इतकेच नाही तर काही लोकांना 100 दशांशपेक्षा जास्त आवाज ऐकायला आवडतात, हे दशांश तुमच्या कानाला तत्काळ नुकसान करण्यासाठी पुरेसे आहेत.इअरबड्स किंवा हेडफोन वापरण्याचा कालावधी मर्यादित प्रमाणात असायला हवा. त्यासोबतच त्याचा आवाज देखील उच्च पातळीवर नको. मोबाईलला ‘हेडफोन’ लावून त्यावरून संवाद साधणे, गाणे ऐकणे यासारख्या सवयी तरुणाईमध्ये आहेत. ‘हेडफोन’ कानामध्ये घट्ट बसतात. त्यामुळे त्यातून येणाऱ्या आवाजाच्या ध्वनीलहरीचा थेट परिणाम कानाच्या श्रवणयंत्रणेवर होतो. ही नस बाधित झाल्यास त्याचा थेट परिणाम श्रवण क्षमतेवर होतो. ‘हेडफोन’ च्या ध्वनिलहरी सामान्य ध्वनी लहरींपेक्षा अधिक पटीने असतात, असे तज्ज्ञ सांगतात. इअरफोन थेट कानात लावला जातो, ज्यामुळे हवेच्या मार्गात अडथळा येतो. या अडथळ्यामुळे बॅक्टेरियाच्या वाढीसह विविध प्रकारचा संसर्ग होऊ शकतो. तुम्हालाही कानाला होणारा त्रास टाळायचा असेल, तर गरज असेल तेव्हाच इअरफोन किंवा हेडफोनचा वापर करा. दिवसभरात 60 मिनिटांपेक्षा अधिक काळ इअरफोनचा वापर करू नये. ते धोकादायक ठरू शकते. कोट मोठ्या आवाजात सतत तीन तास हेडफोनवर गाणी ऐकण्याची सवय आंतरकान आणि कानाच्या पडद्यांना घातक ठरत असते. इयरफोनमधून निघणाऱ्या कंपनांमुळे कानांच्या पेशी त्यांची संवेदनशीलता गमावतात. त्यामुळे अशा व्यक्तींना कमी ऐकण्याची किंवा अजिबात ऐकू न येण्याची समस्या निर्माण होते. अनेकदा लोक हेडफोन इतरांबरोबर शेअर करतात. पण यामुळे इअरफोनच्यामार्फत बॅक्टेरिया, जंतू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या कानापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे कानाला संसर्ग होण्याचा धोका वाढतो. इअरफोन कानात घालून मोठ्या आवजात गाणी एकल्याने मानसिक ताण वाढू शकतो. इअरफोनच्या अतिवापरामुळे कानाच्या पडद्याला हानी पोहोचते. अधिक वेळ इअरफोनच्या वापराने कानातील पेशी मृत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.